Ad will apear here
Next
हिमालयातील स्वर्गारोहण
चारधाम यात्रा म्हणजे यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ यात्रा करण्याची इच्छा अनेकांना असते. ही यात्रा कठीण आहे. चालणे भरपूर आहे, अशी समजूत असते. ती काही अंशी खरी असली, तरी व्यवस्थित नियोजन केले, तर ती सुरळीत पार पडते, हा अनुभव डॉ. मनोहर सालफळे यांनी ‘हिमालयातील स्वर्गारोहण’ या पुस्तकातून केलेल्या मार्गदर्शनाने येतो. 

हिमालय पर्वतरांग ही जगातील महत्त्वाच्या पर्वतांपैकी एक. हिमालयाच्या कुशीतील या धर्मस्थळांचे दर्शन घेण्याबरोबरच तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, समाजजीवन अनुभवणे हा प्रवासातील उद्देश कसा सफल होतो, याचे अनुभवकथन यात केले आहे. प्रवासाची सुरुवात हरिद्वारपासून होते. तेथून यमुनोत्रीचे दर्शन घेतानाचा अनुभव, निसर्गाचे बदलते रूप, गंगोत्री व परिसरातील स्थळांचे दर्शन, टिहरी, रुद्रप्रयाग, उत्तराखंडमधील श्रीनगर, केदारनाथ व बद्रिनाथाचे माहात्म्य, तेथील प्रवासाचे वर्णन लेखकाने केले आहे; मात्र, याचबरोबर घरातून निघाल्यापासून प्रवासात कसे जावे, अंतर, राहण्याची व्यवस्था, स्थलदर्शन, प्रवासाचे पर्याय, खर्चाचा अंदाज, हेही सांगितले आहे.

पुस्तक : हिमालयातील स्वर्गारोहण 
लेखक : मनोहर सालफळे
प्रकाशक : सुदिशा प्रकाशन
पाने : १८७
किंमत : २७५ रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZLYBZ
Similar Posts
नर्मदातिरी मी सदा मस्त नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेऊन तो सदानंद येरवडेकर यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. ‘नर्मदा परिक्रमा ही आहे एक अनुभूती’ असे ते म्हणतात. ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी कशी केली, याची माहिती पुस्तकात प्रारंभी येते. ही पायी परिक्रमा त्यांनी १०८ दिवसांत पूर्ण केली. या प्रवासात त्यांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाले
मी पाहिलेला जपान जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, जपान म्हणजे तंत्रज्ञान, अतिप्रगत देश, असे चित्र उभे राहते. अनेक भारतीयांना जपानचे आकर्षण असते. मुकुंद नारायण लेले यांनी कुतूहलापोटी जपानला दोन वेळा भेट देऊन पर्यटनासाठी होकायडो आणि होन्शू बेटांची निवड केली. तेथील निसर्ग, संस्कृती परंपरा आणि मुख्य म्हणजे आदरातिथ्य अनुभवले
कंबोडिया ते कॅनडा परदेशात सहल म्हटली, की अमेरिका, युरोप यांना पहिली पसंती मिळते. तेथील पर्यटन आता भारतीयांना नवे राहिलेले नाही. अशी रुळलेली पर्यटनस्थळे टाळून कंबोडिया, व्हिएतनाम, जॉर्डन, इस्राइल, ग्रीस, बल्गेरिया अशी आगळ्या देशांची सफर करून पुष्पा जोशी यांनी तेथील प्रवासवर्णन ‘कंबोडिया ते कॅनडा’मधून केले आहे.
नर्मदातिरी मी सदा मस्त ‘नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही’, ‘परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग, तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न, तर कधी नुसतीच बिस्किटे’, ‘दगड- धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language